गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण कोल्हापुरात

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : पुण्यातनंतर गुलेन बॅकरी सिंड्रोम GBS चे रुग्ण आता कोल्हापूरात आढळले आहे. कोल्हापूरमध्ये दोघांना या आजाराची लागण झाली आहे. दोघांवरही सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापुरात जीबीएसची लागण झालेल्या दोन रुग्णांपैकी एक कर्नाटकातील कोगणोळी येथील तर दुसरा रुग्ण हुपरी येथील रहिवासी आहे. हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, राज्यात जीबीएसच्या रुग्णांची वाढती संख्या हा राज्यातील आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढविणारा मुद्दा ठरला आहे.
पुण्यात सध्या सर्वाधिक १११ रुग्ण आहेत. त्यापैकी १७ व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कालच राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता. केंद्रसरकारही आता अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे केंद्रातून काल सात जणांचे पथक महाराष्ट्रासाठी तैनात करण्यात आले आहे. रुग्णसंख्येचे निरीक्षण करण्यासाठी राज्यातील पथकाला याची मदत होणार आहे. पुण्यात आता घरोघरी सर्वेक्षण सुरू झाले आहे. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येमागचे कारण हे दूषित पाणी असल्याचे समोर आले आहे.