फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
देश विदेश

वक्फवरील चर्चेत गोंधळ; १० खासदार निलंबित

वक्फवरील चर्चेत गोंधळ; १० खासदार निलंबित

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या अहवालावर चर्चा होण्याऐवजी खासदारांमध्येच गदारोळ झाला आणि संसदेत चर्चा अर्धवट राहिली.

वादग्रस्त वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) ५०० पानांचा अहवाल तयार झाला आहे. या अहवालावर शुक्रवार आणि शनिवारी अशी दोन दिवस बैठक होऊन चर्चा होणार होती. मात्र आज आज बैठकीच्या पहिल्या दिवशीच खासदारांमध्ये गदारोळ झाला. ज्यामुळे आता विरोधी पक्षाच्या १० खासदारांना समितीमधून निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अरविंद सावंत, असुदद्दीन ओवेसी यांचा समावेश आहे. या बैठकीत अहवालावर चर्चा होऊन ते विधि मंत्रालयाकडे दिले जाणार होते. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"