फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

छत्तीसगडमध्ये चकमकीत १४ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये चकमकीत १४ नक्षलवादी ठार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : छत्तीसगड – ओडिशा सीमेवर गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक नक्षलवादी देखील या चकमकीत ठार झाल्याचे छत्तीसगड पोलिसांनी स्पष्ट केले.

सुरक्षा दलाचे सुमारे एक हजार जवान यामध्ये सहभागी झाले आहेत. कुल्हडी घाटावरील भालू डिग्गी जंगलात ही चकमक सुरू होती. या चकमकीत नक्षलवाद्यांकडचा मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. ओडिसा – छत्तीसगड सीमेवर सोमवारी रात्रीपासून संयुक्त आंतरराज्य कारवाई सुरू होती. ओडिशाच्या सीमेपासून ५ किलोमीटर अंतरावरील परिसरात हे नक्षलवादी मारले गेले आहेत. या मृतांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. कोब्रा युनिटचा एक जवान चकमकीत जखमी झाला आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ओडिशा पोलिस, छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त ऑपरेशन सोमवारी रात्रीपासून नवापारा आणि छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या सीमेवर सुरू झाले. पहाटेच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. यात दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. मोठ्या प्रमाणावर दारूगोळा, शस्त्रसाठा, आयईडी जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आणि जवानांनी अजूनही शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"