फक्त मुद्द्याचं!

10th September 2025
गुन्हेगारी

सैफ अली हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी!

सैफ अली हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी!

मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. ,रविवारी वांद्रे कोर्टात आरोपीला हजर करण्यात आलं न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला शनिवारी रात्री पोलिसींनी अटक केली आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. यानंतर त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम सज्जाद आहे, जो आतापर्यंत विजय दास या नावाने राहत होता. आरोपीकडे कोणतेही वैध भारतीय कागदपत्र नाही. पोलिसांना संशय आहे की आरोपी भारतीय नाही तर तो बांगलादेशातून बेकायदेशीरपणे आला आहे.

पोलिसांनी सर्वप्रथम सैफ अली खानच्या इमारतीमध्ये आणि इमारतीभोवती त्या रात्री कोणते मोबाईल फोन सक्रिय होते, याचा तपास केला. यानंतर पोलिसांनी कोणता मोबाईल गेला याचा काळजीपूर्वक माग काढला. दादर स्टेशनजवळील एका मोबाईल दुकानातून हेडफोन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी ट्रॅक केलं. यामध्ये पोलिसांना आढळलं की, त्याचा मोबाईल सैफ अली खानच्या घराजवळील सक्रिय मोबाईलशी जुळत होता. यानंतर पोलिसांना मोबाईल ठाण्याच्या दिशेने गेल्याचे आढळलं. ठाण्यात त्याचे लोकेशन सापडताच पोलिसांनी त्याला सर्व बाजूंनी घेरलं. आरोपी दाट झाडांमध्ये लपला होता, पण पोलिसांनी त्याला पकडले आणि अटक केली. आरोपी सैफ अली खानच्या घरात फक्त चोरी करण्यासाठीच घुसला होता. तो आर्थिक अडचणीचा सामना करत होता, त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं.

पोलिसांनी सर्वप्रथम सैफ अली खानच्या इमारतीमध्ये आणि इमारतीभोवती त्या रात्री कोणते मोबाईल फोन सक्रिय होते, याचा तपास केला. दादर स्टेशनजवळील एका मोबाईल दुकानातून हेडफोन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी ट्रॅक केलं. यामध्ये पोलिसांना आढळलं की, त्याचा मोबाईल सैफ अली खानच्या घराजवळील सक्रिय मोबाईलशी जुळत होता. यानंतर पोलिसांना मोबाईल ठाण्याच्या दिशेने गेल्याचे आढळलं. ठाण्यात त्याचे लोकेशन सापडताच पोलिसांनी त्याला सर्व बाजूंनी घेरलं. आरोपी दाट झाडांमध्ये लपला होता, पण पोलिसांनी त्याला पकडले आणि अटक केली..

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"