फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
Live news

आसाम खाण दुर्घटना : आणखी एक मृतदेह सापडला

आसाम खाण दुर्घटना : आणखी एक मृतदेह सापडला

अडकलेल्या नऊ कामगारांपैकी आतापर्यंत दोघांचे मृतदेह सापडले

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
गुवाहाटी (वृत्तसंस्था) : आसाम इथल्या दिमा हसाओ जिल्ह्यात कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांपैकी आणखी एकाचा मृतदेह आज सापडला आहे. मृतांची संख्या आता दोन झाली आहे. अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील बेकायदेशीर कोळसा खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना शोधण्यासाठी आज सलग सहाव्या दिवशीही अनेक राज्य आणि केंद्रीय एजन्सींचे बचाव कार्य सुरूच आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आसामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे या खाणीत काम करणारे मजूर आतच अडकले. सुमारे ३०० फूट खोल असलेल्या खाणीमध्ये पावसाचे पाणी सुमारे १०० फुटापर्यंत साचले होते. यातच बुधवारी एका कामगाराचा मृत्यू झाला. रात्रभर पाण्याचा निचरा केल्यानंतर शोध मोहीम दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा सुरू झाली आणि रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल (ROV) पूरग्रस्त खाण परिसराच्या आत नेण्यात आले आहे, असे आसाम पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.

आतापर्यंत, रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल द्वारे शोध घेताना काहीही आढळले नाही. अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थिती असतानाही अडकलेल्या खाण कामगारांना शोधण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. खाणीच्या आत असलेले पाणी आता पूर्णपणे काळे झाले आहे आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्यास पथकाला अडचणी येत आहेत.पहिला मृतदेह बुधवारी मिळाला होता. त्यानंतर आज शनिवारी दुसरा मृतदेह हाती लागला आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"