फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

कंटेनरच्‍या धडकेत टेम्‍पोतील दोघांचा मृत्‍यू

कंटेनरच्‍या धडकेत टेम्‍पोतील दोघांचा मृत्‍यू

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भरधाव वेगातील कंटेनरने टेम्‍पोला धडक दिल्यामुळे टेम्‍पोतील दोघांचा मृत्‍यू झाला. ही घटना चाकण शिक्रापूर रस्‍त्‍यावर मोहितेवाडी येथे घडली.

चाकण पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार चेतन शालीकरम अहिरे (वय २४) आणि गणेश मास्ती पानसरे (वय ४२, रा बहुळ) अशी अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍यांची नावे आहेत. अमन जालीग्राम अहिरे (वय २७, रा. सद्‌गुरु फर्निचर जवळ, किसनाबाई लष्करे यांच्या खोलीत, कडाचीवाडी चाकण, ता खेड, जि. पुणे. मूळ रा. धोनखेड, ता. मोताडा, जि. बुलढाणा) यांनी गुरुवारीपोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात कंटेनर चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

कंटेनर चालक पळून गेला
अज्ञात कंटेनर चालकाने त्‍याच्‍या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगात चालविला. वाहतकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून महिंद्रा जितो टेम्‍पो याला धडक दिली. यावेळी गाडीत बसलेले चालक चेतन अहिरे आणि त्‍याच्‍या बाजूला बसलेले गणेश पानसरे हे जखमी झाले. उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. तसेच आरोपी कंटेनर चालकाने टेम्‍पोचे नुकसान केले. अपघातानंतर पोलिसांना माहिती न देता तसेच जखमींना उपचारासाठी न नेता कंटेनर चालक पळून गेला.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"