फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पुणे

पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले!

पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले!

थेऊर परिसरातील रूपे वस्तीतील घटना : पीडीआरएफ पथकाकडूनही शर्तीचे प्रयत्न
पिंपरी : पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती उद्भवत आहे. सोमवारी पहाटे ३ वाजता थेऊर (ता. हवेली) गावातील रुपे वस्ती परिसरातील ओढ्याला पूर आल्याने यात अडकलेल्या ग्रामस्थांना पीएमआरडीए व पीडीआरएफ पथकातील जवानांनी मदतकार्य करून सुमारे ७० पेक्षा अधिक जणांना सुखरूप बाहेर काढले.

viara vcc
viara vcc

हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला पूर आल्याने जवळपास १५० लोकांच्या वस्तीत सोमवारी पहाटे ३ वाजता पाणी शिरले होते. या घटनेची माहिती मिळतात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि पीडीआरफ पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून घरांमध्ये अडकलेल्या सुमारे ७० पेक्षा अधिक ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलव‍िण्यात आले.

या पुरामध्ये म्हशी, शेळ्या, कोंबड्या हे पाळीव प्राणी काही प्रमाणात वाचवण्यात आले. तर काही वाहून गेले आणि काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली. या बचाव पथकात अग्निशमन केंद्र आध‍िकारी विजय महाजन, जितेंद्र तळेले, महेश आव्हाड, शुभम बढे, शुभम चौधरी, उमेश फाळके, सुरज इंगवले, साईनाथ मोरे, किरण राठोड, अभिषेक पावर, प्रकाश मदने, तेजस डांगरे, सिद्धांत जाधव, शुभम पोटे, दिग्विजय नलावडे, सागर जानकर, करण पाडुळे, राजेंद्र फुंदे, प्राणिल दराडे, लहू मुंडे, राहुल शिंदे आदी जवानांचा समावेश होता.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"