ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून 64 लाखाचा गंडा;दोघांना अटक!

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आठ ते पंचवीस टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 63 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.त्यांच्या बँक खात्यावरून एक कोटी 15 लाख रुपयांचा व्यवहार झाला असून त्याबाबत विविध राज्यातून दहा तक्रारी दाखल झाले आहेत.

प्रथमेश शिवाजी भुसे ( 23 लोहगाव,पुणे मूळ राहणार,अहिल्यानगर), सचिन राधाकिशन मोरे (34 ,राहणार दिघी)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची 10 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत 63 लाख 93 हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाल्याबाबत पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात 25 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला होता. फेसबुक पाहत असताना तक्रारदार व्यक्तीला एक जाहिरात दिसली.त्यानंतर वेगवेगळ्या लिंक द्वारे शेअर खरेदी करण्यात सांगत फसवणूक केली. तक्रारदार व्यक्तीला त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर सात कोटी छप्पन लाख ९१४६० रुपये नफा देण्याचे दाखवले. तक्रारदाराने पैसे पाठवलेल्या बँक खात्याची माहिती सायबर पोलिसांनी काढली.संबंधित बँक खाते मातोश्री पॅथॉलॉजी लॅबरोटरी या नावाने असून त्याची केवायसी प्रथमेश भुसे यांच्या नावावर असल्याने निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी प्रथमेशला ताब्यात घेतले.साथीदार सचिन मोरे यांच्या सोबत मिळून हा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी सचिन मोरे यालाही ताब्यात घेतले.संशयीतांनी तक्रारदाराकडून पैसे घेतल्यानंतर ते बँकेतून रोख स्वरूपात काढून त्याची विल्हेवाट लावली. संशयतांनी वापरलेल्या बँक खात्यावर एक कोटी 15 लाख 85000789 रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसून आले.पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार,सहाय्यक आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील,सागर कोमल,रोहित डोळस,प्रकाश कातकाडे,विद्या पाटील, दीपक भोसले,विनायक मस्कर,हेमंत खरात,कृष्णा गवळी,श्रीकांत कबुले,अभिजीत उकिरडे,अतुल लोखंडे,माधव आरोटे,सोपान बोधवड,संतोष सपकाळ,दिपाली चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत

