फक्त मुद्द्याचं!

15th March 2026
गुन्हेगारी

तीन पत्ती जुगार खेळणारे 6 जण अटक!

तीन पत्ती जुगार खेळणारे 6 जण अटक!

पिंपरी : विनापरवाना तीन पत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार 13 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रामनगर चिंचवड दातीर यांच्या शेतात करण्यात आली.

याप्रकरणी मारुती महादेव करसुंडे पोलीस हवालदार, गुन्हे शाखा युनिट एक, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भरत यल्लाप्पा पवार (वय 55, रामनगर, मोहन नगर, चिंचवड), सुभाष बन्सी ओव्हाळ (वय 51, रामनगर मोहन नगर, चिंचवड), शिवाजी नागप्पा दोडमणी (वय 54, आनंद नगर झोपडपट्टी, चिंचवड), मच्छिंद्र विठ्ठल पवार (वय 52, रामनगर मोहन नगर, चिंचवड), विनायक चंद्रशेखर धुमाळ (वय 40, रा. रामनगर मोहन नगर, चिंचवड), सुरेश महादेव धनवटे (वय 46, रामनगर, श्रीराम मंदिरामागे, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील ठिकाणी विनापरवाना स्वतःच्या फायद्या करिता पैसे लावून तीन पत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 4170 रुपये रोख रक्कम व पत्त्यांचे पानासह जप्त करण्यात आले. पिंपरी पोलीस ठाण्यातचे पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

कोकोरिको हॉटेल भुगावमध्ये हुक्का पॅाट ; दोघांना अटक!
पिंपरी : खाद्यपदार्थासोबत नागरिकांना तंबाखूजन्य व ज्वालाग्रही पदार्थाचा हुक्का पॅाट व हुक्का फ्लेवर देऊन आदेशाचा भंग केला. यावेळी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवार 13 मार्च रोजी साडेतीनचे सुमारास कोकोरिको हॉटेल भुगाव रोड येथे करण्यात आली.

याप्रकरणी विशाल प्रल्हाद शिंदे बावधन पोलीस ठाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अमित अरुण अमराळे (वय 45, रा.मु.पो. सुतारवाडी, ता. मुळशी), पंकज भुवन जोशी (वय 35, दौलत पेट्रोल पंप मागे, भुगाव, सोनिका सोसायटी )असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी कोकोरिको हॉटेल भुगाव येथे लोकांना खाद्यपदार्थासोबत हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली .प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे पाच हुक्का पाॅट, पाच हुक्का पाईप (किंमत दीड हजार रुपये प्रत्येकी) तसेच हुक्का फ्लेवर आणि हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य पुरवून इतरांच्या जीवितास धोका होईल असे तंबाखूजन्य उज्वलाग्रही पदार्थाचा हुक्का पाॅट व फ्लेवर जवळ बाळगला. बावधन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"