फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली 55 लाखाची फसवणूक!

ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली 55 लाखाची फसवणूक!

पिंपरी : ऑनलाईन ओटीसी ट्रेडिंग मध्ये 100% नफा मिळवण्याचे आमीष दाखवून एका महिलेची 55 लाख 22000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना चिखली येथे ऑनलाईन पद्धतीने घडली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

अनुप्रिता डागा आणि इतर खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका सदतीस वर्षीय महिलेने शनिवार सहा डिसेंबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 26 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून चिखली येथे घडला. आरोपी अनुप्रिता डागा हिने स्वतःला दोन ग्रुपची एडमिन म्हणून फिर्यादी यांना शेअर बाजारातील ओटीसी ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले शंभर टक्के परतावा मिळेल असे सांगून फिर्यादी कडून विविध बँक खात्यातून एकूण 55 लाख 22 हजार 791 रक्कम जमा करून घेतली .परंतु गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता आरोपींनी फसवणूक केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"