शेअर ट्रेडिंग गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने 42 लाखाची फसवणुक!

पिंपरी: शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास दहा ते पंधरा टक्के पेक्षा जास्त फायदा देण्याचे आमिष आमीष दाखवून एका व्यक्तीची 42 लाख 48 हजार 900 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. ही घटना 11 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत घडली.

याबाबत महेश विलास सगरे (वय 51, रा. शेवंतीबन कॉलनी, सर्वे नंबर 66, लेन नंबर 02, रावजी गार्डन समोर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिताली मिश्रा आणि सुमारे दहा विविध बँकांचे खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून आरोपींनी सांगितल्याप्रमाणे शेअर ट्रेडिंग केल्यास दहा ते पंधरा टक्के पेक्षा जास्त फायदा देण्याचे अमिष दाखवले. एस सिक्युरिटी नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडले. व व्हाट्सअप द्वारे वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्या खात्यावर खोटा नफा दाखवून तो काढण्यासाठी पुन्हा वेगवेगळे टॅक्सची कारणे सांगून रक्कम भरण्यास पाडून 42 लाख 48 हजार 900 रुपयांची फसवणूक केली .चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे जाधव हे तपास करत आहेत.

