चिनी पार्ट्स वापरल्यामुळे ४०० ड्रोन खरेदीची डील कॅन्सल!

२३० कोटींचे कंत्राट केले रद्द
नवी दिल्ली : सुरक्षेच्या कारणास्तव संरक्षण खात्याने ४०० ड्रोन खरेदीचे कंत्राट रद्द केले आहे. या ड्रोनमध्ये चिनी उपकरणांचा वापर केला असल्याने सायबर सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे ड्रोन तीन वेगवेगळ्या कराराद्वारे खरेदी केले जाणार होते. २३० कोटींच्या या कंत्राटात २०० मध्यम उंचीचे ड्रोन, १०० मोठे ड्रोन व १०० हलके ड्रोन आदींचा समावेश होता. हे सर्व ड्रोन भारतात बनवले होते. मात्र त्यात चिनी उपकरणे होती. त्यामुळे सायबर सुरक्षेची जोखीम व भारतीय सैन्य मोहिमेला धोका निर्माण झाला असता. चिनी उपकरणांमुळे माहितीचे हॅकिंग, कारवाईच्या वेळी अचानक यंत्रणा खराब होणे आदी धोके निर्माण झाले असते.
तज्ज्ञांनी सांगितले की, चिनी उपकरणे असलेले ‘मेड इन इंडिया’ ड्रोन हे सायबर सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. माहितीच्या चोरीचा मोठा धोका आहे. त्यामुळे सैन्यदलाच्या संवेदनशील मोहिमांची माहिती फुटू शकते. लष्कराच्या गुप्तचर महासंचालकांनी संवेदनशील व सुरक्षा उपकरणांमध्ये चिनी उपकरणे वापरू नयेत, याबाबत अनेक वेळा निर्देश दिले आहेत. यंत्रणेत हार्डवेअर व सॉफ्टवेअर हे २३० कोटींचे कंत्राट.