अफगाणिस्तानातील भूकंपात 800 जण मृत्युमुखी !

2500 जखमी ; आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन
काबुल : अफगाणिस्तानच्या कुनर प्रांतात रविवारी रात्री झालेल्या जोरदार भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार अडीचशे लोकांचा मृत्यू आणि 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत . युनायटेड स्टेटस जिओ लॉजिकल सर्व्हे ( युएसजीएस ) नुसार भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर् स्केल एवढी होती . लागोपाठ दोन भूकंप झाल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत . दुसरा भूकंप 4.5 रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा होता .युएसजीएस नुसार भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान मधील जलालाबादच्या पूर्व ईशान्येस 27 किलोमीटर अंतरावर आठ किलोमीटर खोलीवर होते भारतीय वेळेनुसार रात्री बारा वाजून 47 मिनिटांनी हे धक्के जाणवले

या भूकंपामुळे सुरुवातीला मृतांचा आकडा कमी सांगण्यात येत होता ,मात्र अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाने सांगितले की ,250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे कुनर प्रांताला सर्वाधिक फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे . सध्या अफगाणिस्तान मधील भूकंपग्रस्त भागांमध्ये अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवांची तातडीने गरज आहे .मदत संघटनांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित मदत करण्याचे आव्हान केले आहे . कुनर , नंबरहार आणि नुरीस्तान प्रांतामध्ये संपूर्ण गावे जमीन दोस्त झाली आहेत .महिला , मुले आणि वृद्ध यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे . तालिबान सरकारकडून योग्य मदत मिळत नसल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी 7 ऑक्टोबर 2023 रोजी आलेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती .त्यात तालिबान सरकारकडून 4000 लोकांचा मृत्यू तर संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार सुमारे दीड हजार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते . भूकंपाचे केंद्र नगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळ होते आणि त्याची खोली केवळ आठ किलोमीटर इतकी होती . या भूकंपाचे धक्के पाकिस्तानपर्यंत जाणवल्याची माहिती समोर येत आहे.