फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
गुन्हेगारी

 मामुर्डी येथे 21 किलो गांजा जप्त; दोन व्यक्तींना अटक!

 मामुर्डी येथे 21 किलो गांजा जप्त; दोन व्यक्तींना अटक!

पिंपरी: अवैधरित्या 4लाख 6हजार रुपये अमली पदार्थ गांजा गांजा विक्री साठी ताब्यात ठेवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार दोन डिसेंबर रोजी पाच वाजण्याच्या सुमारास कुणाल आयकॉनिया सोसायटी एफ -801 पार्किंग मध्ये मामुर्डी येथे घडली.

viara vcc
viara vcc

 याप्रकरणी प्रदीप गोरक्षनाथ गोडांबे (वय 40, पोलीस हवालदार, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ओमकार हरी इंगवले (वय 25, अक्षय रेसिडेन्सी, रो हाऊस नंबर 11, म्हेत्रे वस्ती, कृष्णानगर, चिखली), आयुष राजेंद्र भट (वय 25, प्लॉट नंबर 415, सेक्टर 18, शिवतेज नगर चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. किशोर रा. मुंबई हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी चार लाख पाच हजार 966 रुपये किमतीचा 21 किलो ते 30 ग्रॅम वजनाचा गांजा आरोपी क्रमांक तीन यांच्याकडून विकत घेऊन बेकायदेशीररित्या विक्री करीत असताना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राठोड हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"