फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पुणे

धूलिवंदनानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांचा महोत्सव!

धूलिवंदनानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांचा महोत्सव!

पुणे : राज्यभरात होळी आणि धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. सर्वत्र रंगोमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पुणेकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये देखील धूलिवंदन सणाचा मोठा उत्साह दिसून आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला आहे. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तसेच मंदिरातील आकर्षक आरास पाहण्यासाठी भाविकांच्या सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.

काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.

प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी म्हटले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"