लालबाग राजाला अनंत अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकूट अर्पण

मुंबई : गणेश उत्सव म्हटलं की मुंबईत सर्वाधिक चर्चा असते ती लालबागचा राजा गणपतीच्या मूर्तीची, त्या मूर्ती भोवतीची आरास, सुंदर देखावा हे सगळं काही मन मोहून टाकणारं असतं. या मंडळाचं हे ९१ वं वर्ष आहे. यावेळी लालबागच्या राजाला अनंत अंबानींनी सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे.
मयूरासनावर विराजमान लालबागचा राजा
यंदा लालबागचा राजा मयूरासनावर विराजमान आहे. गणपती बाप्पा मोरया.. लागबागचा राजा… मोरया.. अशा घोषणांनी लालबाग परिसर दणाणून गेला होता. या गणपती बाप्पांचं दर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भाविकांनी घेतले. आपल्या मोबाईलमध्ये लालबागचा राजा गणपतीचं रुप साठवण्यासाठीही मंडळ ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यंदाच्या लालबागच्या राजाचा मुकूट हा सोन्याचा आहे. देशातील गर्भश्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे हा मुकूट अर्पण केला आहे अशी चर्चा आहे.
नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी लालबागच्या या गणपतीची ख्याती आहे. त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे सेलिब्रिटी, राजकारणी, देश-विदेशातले व्हीव्हीआयपीही येतात. मुकेश अंबानी यांचीही सहकुटुंब उपस्थिती लालबागच्या राजाच्या दर्शनाला असते. या वर्षी अनंत आणि राधिका यांचं लग्नसोहळा पार पडला. यानंतर लालबागचा राजा कार्यकारिणी मंडळाच्या विश्वस्त पदावर अनंत अंबानींची नियुक्ती करण्यात आली. महिन्याभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. आता अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकूट भेट दिला आहे. या मुकुटाचं वजन २० किलो एवढं आहे. तर, किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट बनवण्याकरता कारागीरांना दोन महिने लागले होते,