फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी

एलआयसीत गुंतवणुकीच्या बहाण्याने २ लाखांची फसवणूक

एलआयसीत गुंतवणुकीच्या बहाण्याने २ लाखांची फसवणूक

पिंपरी : एलआयसी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून फोनवरून बोलणाऱ्या अनोळखी महिलेने एकाला एलआयसी एजंट म्हणून घरी पाठविले. त्या एजंटने व्यक्तीला गुंतवणूक करण्यास सांगत त्याच्याकडून दोन लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना ९ नोव्हेंबर २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी ५२ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिला, एलआयसी एजंट बनून आलेला दीपक जाधव (वय ३५) आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीस फोन करून ती एलआयसी ऑफिस, शिवाजीनगर येथून बोलत असल्याचे सांगितले. एलआयसीने ‘एलआयसी एनबीएफसी इन्फ्रा बॉण्ड’ या नावाने नवीन गुंतवणूक प्लॅन सुरू केला आहे.

याबाबत आमचे एजंट तुमच्या घरी येऊन प्लॅनबाबत सविस्तर माहिती देतील, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या घरी संशयित दीपक जाधव आला. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना संबंधित प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर गुंतवणूक पाहण्यासाठी फेक लिंक पाठवून त्यांची फसवणूक केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"