पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमधून १७ जण तडीपार!

सराईत गुन्हेगारांना पोलिसांचा चाप
पिंपरी: पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, सहा महिने, एक वर्ष आणि दोन वर्ष असे गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ अंतर्गत आयुक्त विनय कुमार चौबे आणि अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवड यांनी सर्व पोलीस ठाण्यांकडून माहिती मागवली होती. त्यानुसार परिमंडळ तीन अंतर्गत १७ जणांचे तडीपार प्रस्ताव तयार केले होते. त्यानुसार गुन्हेगारांना तडीपार केले आहे. ऑगस्ट महिन्यात १५ जणांना तडीपार केले होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत १६८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.
चाकणमधील १० जण तडीपार
चाकण पोलीस हद्दीतील रवीना अमर राठोड (रा. मंथननगर, मेदनकरवाडी), मंजिला उत्तरसिंग राठोड (रा. तुकाई वस्ती, काळुस भोसे) या दोन महिलांना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्याचबरोबर विशाल दीपक सकट (रा. साठेनगर) याला वर्षासाठी तर गंगाधर सुंदर ओहाळ (रा. कडाचीवाडी तालुका खेड), संजय बळीराम गाडे (रा. कडाचीवाडी खेड), जिलानी इस्माईल सय्यद (रा. गजानन कॉलनी मेदनकरवाडी) या तिघांना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. गणेश लक्ष्मण शिरसागर (रा खेड) याला दोन वर्षासाठी, रमाकांत शांताराम सोनवणे (रा. चिंबळी) याला एक वर्षासाठी, फुलवंती जयेश राठोड (रा. गवतेवशी मेदनकरवाडी) हिला सहा महिन्यांसाठी, बबलू रमेश टोपे (रा. टोपेवाडी वाकी बुद्रुक) याला एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
दिघीतुन ३ जण तडीपार
दिघी पोलीस ठाणे हद्दीतील सोमेश मोहन लोखंडे (रा. इंद्रायणी नगर याला दोन वर्षासाठी, आशा वालचंद नट (रा भोसरी) हिला एक वर्षासाठी, अंकुश बालाजी तांदळे (रा. केळगाव) याला सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे.
एमआयडीसीतुन दोन जण तडीपार
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील माऊली काळुराम कलवडे (रा पराळे) याला एक वर्षासाठी, अनिकेत उद्धव कडलक (रा. निघोजे) याला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
आळंदीतून दोन जण तडीपार
आळंदी पोलीस हद्दीतील शिवाजी पांडुरंग कोळेकर (रा. कोयाळी) याला एक वर्षासाठी, किशोर उर्फ कृष्ण अशोक पवार (रा. वडगाव रोड साठे नगर आळंदी) याला एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
परिमंडळ तीनच्या हद्दीतील शंभरहून अधिक गुन्हेगारांच्या हालचालीवर पुरुषांचे बारकाईने लक्ष आहे. तडीपार केलेल्या सर्व महिला आणि पुरुष गुन्हेगार हे २३ ते ४८ वयोगटातील आहेत . – बापू बांगर (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३ )

