फक्त मुद्द्याचं!

9th March 2026
गुन्हेगारी

चोरीला गेलेले 130 मोबाईल मूळ मालकांना परत!

चोरीला गेलेले 130 मोबाईल मूळ मालकांना परत!

पिंपरी : विविध ठिकाणी हरवलेले अथवा चोरीला गेलेले 130 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. सांगवी पोलिसांकडून अशा विविध ठिकाणाहून हरवलेले अथवा घाळ झालेल्या मोबाईलचा तपास सुरू ठेवण्यात आला होता.

त्यानुसार 130 मोबाईल सीइआयआर पोर्टल द्वारे त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार संबंधित तक्रारदार यांना बोलावून ते मोबाईल शनिवार सात मार्च रोजी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. सांगवी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या हस्ते ते मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली.

viara vcc
viara vcc

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने विक्रेत्याला गंभीर मारहाण!
पिंपरी : दारू पिण्यासाठी एक हजार रुपये न दिल्याने चौघांनी मिळून परराज्यातील एका विक्रेत्याला गंभीर मारहाण केली. दापोडी येथील कुक्कडवाला परिसरात 3 मार्च सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे

.गणेश भिसे, राम अशोक कांबळे (वय 24), संकेत भालचंद्र वाघमारे , वेदांत मोरे (वय 24, सर्व रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रांशु श्याम बारमेडा (वय 25, रा. कृष्णनगर, सांगवी, मूळ रा. जानोदत्ता, जि. पाली, राजस्थान) असे जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मातीची भांडी विक्री करतात. ते दुकानात असताना वरील चौघे तेथे आले, आम्हाला दारू पिण्यासाठी एक हजार रुपये दे असे म्हणत दमदाटी केली. पैसे दिले नाहीत याचा राग मनात आल्याने चौघांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीचे नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे असे पोलिसांनी सांगितले. दापोडी पोलीस उपनिरीक्षक सुरेश देशमुख तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"