इंदापूरला बसच्या अपघात १३ जखमी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गलांडवाडीच्या हद्दीत खासगी बसचा टायर फुटल्याने बस रस्ता सोडून २० फूट खड्ड्यात पडली. यात १३ प्रवासी जखमी झाले. रविवारी संध्याकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.ट्रक आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला बस धडकली त्यामुळे हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल मारुती कदम (वय ६५ रा. सांगोला), सुनील जाधव (वय ३२, रा. नाझरा),नवनाथ अरुण पिसे, (वय२३ रा . पिलीव), मनिषा सतीश यादव (वय ३८ रा.महुद), भूपालसिंह संभाजी घाडगे (वय २४ आलेगाव ता. सांगोला),नानासो तात्यासो इंगवले (वय ६३), रूपाली श्रीकांत दुधाडे (वय ३२ रा. तांदुळवाडी), विराज श्रीकांत दुधाडे (वय ६),याकुब शेख (वय ३५ रा. वाडीचिंचोली), आरिफ याकूब शेख (वय ५),मयूर मुरलीधर सागर (वय ३४ , रा.आटपाडी), प्रतीक्षा सचिन बोथरे (वय २२), प्रवीण दादासाहेब रणदिवे, (वय २९ रा. जंक्शन ,ता. इंदापूर) अशी अपघातातील जखमींची नावे असून त्यांच्या इंदापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अपघातग्रस्त बस (क्र. एम.एच.०९ के. एफ.५९६९) सांगोला येथून पुण्याला निघाली होती. ट्रक देखील पुण्याच्या दिशेने चालला होता. बसचे टायर फुटल्याने भरधाव वेगातील बस ट्रकवर(क्र. टी.एन. ९३ बी ३०६२) आदळली. रस्ता सोडून २५ ते ३० फूट खाली घसरत गेली.घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस व राष्ट्रीय महामार्गाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली.