फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पुणे

जिल्ह्यासाठी 115 आधार नोंदणी संच मंजूर!

जिल्ह्यासाठी 115 आधार नोंदणी संच मंजूर!

पुणे : नवीन आधार नोंदणी संच वितरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधार नोंदणी केंद्राकरिता अर्ज मागविणेत आले होते. यासाठी 356 अर्ज प्राप्त झाले होते. यातील 272 अर्ज पात्र ठरले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पात्र अर्जदारांसमक्ष आधार संच वितरण सोडत 12 जून रोजी घेण्यात आली. यामध्ये एकूण 115 पात्र अर्जदारांना नवीन आधार नोंदणी संचांची मंजूरी अटी व शर्तीच्या अधीन राहून देणेत आली.
आधार नोंदणी केंद्राकरिता ग्रामीण कार्यक्षेत्राकरिता 65 रिक्त केंद्र जाहिर केली होती त्यामध्ये 62 अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करणेत आली आहेत.

viarasmall
viarasmall

नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये एकूण 7 रिक्त केंद्र जाहिर केली होती त्यामध्ये 7अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली. पुणे महानगर पालिका कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये एकूण 22 रिक्त केंद्र जाहिर केली होती त्यामध्ये 22 अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण 28 रिक्त केंद्र जाहिर केली होती ,त्यामध्ये 24 अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली आहेत.
या नवीन आधार संच वितरण सोडतीवेळी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी, श्रीमती पल्लवी घाटगे, उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी व आधार संच वितरण समिती सद

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"