फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
लाईफस्टाईल

हे रोप तुमच्या घरातलं वातावरण बदलेल

हे रोप तुमच्या घरातलं वातावरण बदलेल

आफ्रिकी देशांमध्ये पूर्वी आढळणारं हे रोप, दिसायला अतिशय सुंदर. या रोपाचे फायदे इतके आहेत की आता हे भारतात सुद्धा ते अगदी सहज उपलब्ध होतं आणि मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड सुद्धा केली जाते. या रोपाची वैशिष्ट्य पाहून इंटिरिअर डिझायनर, वास्तूविशारद तज्ज्ञ तसंच हॉर्टिकल्चर तज्ज्ञ सुद्धा हे रोप इनडोअर लावण्याचा सल्ला देतात. कोणतं आहे हे रोप ते जाणून घेऊया.

आपण नेहमीच उन्हापासून बचाव करण्यासाठी पंखा, एसी, कूलर या सगळ्याची सोय घराघरांमध्ये करून घेतो. घराच्या आतलं तापमान कमी होऊ नये आणि घरात गार वाटावं यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. पण कृत्रीम उपाय किती केले तरी नैसर्गिक उपयांशी तुलनाच करता येत नाही.

फक्त मोठे वृक्षच नाही तर अगदी कुंडीत लावलेली लहान रोपं सुद्धा याला वरचढ ठरू शकतील. आज अशाच काही उन्हाळ्यात जादू करणाऱ्या रोपांबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. लहानशा कुंडीत येणारं हे रोप तुमच्या घराला पूर्णपणे गार राहण्यासाठी मदत करतं. हे रोप म्हणजे स्नेक प्लांट. सापाच्या अंगावर जसे खवले असतात, त्याप्रमाणे याची पानं असल्यानं त्याला स्नेक प्लांट म्हटलं जातं. खरंतर तज्ज्ञ सांगतात की, एकदा लावलेलं रोप जवळपास 10-12 वर्षांपर्यंत जगू शकतं. कित्येकदा त्याची फार देखभाल न करताही ते 20 वर्षांपर्यंत जगू शकतं.

काय आहेत स्नेक प्लांटचे गुण?

  • हवा शुद्ध करणं, हवेतली विषारी प्रदूषकं नष्ट करणं.
  • आपल्याला श्वासोश्वासासाठी शुद्ध हवा मिळते. याला नॅचरल ह्युमिडिफायर म्हणता येईल.
  • हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण या रोपामुळं कमी होतं.
  • आसपासचं तापमान सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • प्रदूषणारोधक गुण असलेलं हे रोप एलर्जिक घटकांना सुद्धा शोषून घेतं.
  • मानसिक आरोग्य आणि शांतता कायम राहते.
  • या रोपाच्या सौंदर्यामुळं पाहताक्षणी मनाला आनंद मिळतो.
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"