फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
देश विदेश

संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत असून १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. तसेच अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अधिवेशनामध्ये ९० वर्षे जुन्या असलेल्या विमान कायद्याला बदलण्यासाठीच्या विधेयकासह सहा विधेयके सादर केली जातील, त्याशिवाय केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रीजीजू यांनी अधिवेशनादरम्यान कोणते मुद्दे मांडायचे आहेत हे समजून घेण्यासाठी संसदेतील राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. सीतारामन सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षणही मांडणार आहेत.

कामकाज सल्लागार समितीमध्ये सावंत
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सल्लागार समिती स्थापन केली आहे़ सभागृहाच्या कामकाजाबाबत ही समिती धोरण ठरवेल़ बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा समावेश आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"