फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
महाराष्ट्र राजकारण

विधानसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

विधानसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

मुंबई, विशेष प्रतिनिधी : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं गेल्या आठवड्यात सूप वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून आता राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचे गेल्या आठवड्यात सूप वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वत्र आढावा बैठका, सभा, विशेष मोहिमा घेणे सुरू आहे. त्यासाठी काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षासह अनेक प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय स्तरावरील नेते राज्याला भेट देत मार्गदर्शन करत आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलैला सकाळी १० वाजता गरवारे क्लब येथे बैठक होईल. त्याला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होईल.

या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जाणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस आमदारांच्या मतांच्या फाटाफुटीबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे. पक्षाच्या विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांच्या विरोधात लवकरच कारवाई केली जाणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"