फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
देश विदेश राजकारण

लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रथमच निवडणूक

लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रथमच निवडणूक

नवी दिल्ली, प्रतिनिधी : देशातल्या १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता बिनविरोध होणार नाही. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. काँग्रेसकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं अध्यक्षपदाची निवडणूक यंदा बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट आहे.

खासदार ओम बिर्ला यांना समर्थन दिले जावे, अशी विनंती मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना केली होती. प्रथेनुसार विरोधकांनी एनडीएकडे उपाध्यक्षपदीची मागणी केली होती. मात्र, त्या मागणीस कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. परिणामी, यंदा प्रथमच लोकसभेच्या इतिहासात अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"