लष्करप्रमुखपदी उपेंद्र द्विवेदी

नवी दिल्ली, प्रतिनिधी : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यांनी विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना भारताच्या चीन तसेच पाकिस्तानजवळील सीमेवर काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. तसेच त्यांची काश्मीरमध्येही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जनरल द्विवेदी सध्या लष्कराचे उप-प्रमुख म्हणून कार्यरत असून जनरल मनोज पांडे ३० जूनला निवृत्त झाले. त्यावेळेस द्विवेदी यांनी नवीन लष्करप्रमुखचा पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांची नियुक्ती करताना केंद्र सरकारने सेवाज्येष्ठता तत्त्वाचे पालन केलेले आहे. केंद्र सरकारने गेल्या महिन्यामध्ये जनरल पांडे यांचा कार्यकाळ त्यांच्या निवृत्तीच्या काही दिवस आधी एक महिन्याने वाढविला होता. यापूर्वी ते ३१ मे रोजी निवृत्त झाले.
द्विवेदी यांच्याविषयी थोडक्यात आढावा :
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म १ जुलै १९६४ रोजी झाला असून त्यांनी रेवा येथील सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. १५ डिसेंबर १९८४ रोजी ते भारतीय लष्कराच्या जम्मू काश्मीर रायफल्समध्ये भरती झालेले होते. सध्या लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी सध्या उपसेनाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी २०२२-२४ पर्यंत उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पूर्व लडाखसंदर्भात चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी अतिशय चोख भूमिका बजावली होती. देशाच्या नव्या लष्करप्रमुखांकडे देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर काम करण्याचा दीर्घ अनुभव असून त्यांनी काश्मीर आणि राजस्थानमधील युनिटचेही नेतृत्व आधीच्या काळात केलेले आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये बंडखोरीविरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाया केलेल्या आहेत. ४० वर्षांचा दीर्घ अनुभव असल्यामुळे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारताच्या संरक्षण मंत्रालयाने नवे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.