फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
Uncategorized

भटक्या, ओबीसीमध्ये नव्या जाती, शासन निर्णय जारी

भटक्या, ओबीसीमध्ये नव्या जाती, शासन निर्णय जारी

मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार ठेलारी जातीचा धनगर जातीत समावेश करण्यात आला आहे. तर केवट-तागवाले या जातीचा भटक्या जमाती समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ठेलारी व केवट तागवाले समाजाला दिलासा मिळाला असून सर्व फायदे मिळतील.

राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीत राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे.

नव्या बदलानुसार यापुढे ” ठेलारी” ही जात ‘भटक्या जमाती (ब)’ यादीतील अ.क्र. २७ येथून वगळून ‘भटक्या जमाती (क)’ यादीतील अ.क्र.२९ मध्ये धनगर जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे.

तर केवट-तागवाले या जातीचा भटक्या जमाती (ब) मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्ग यादीतील अ. क्र. १८२ मधील माळी, बागवान,राईन (बागवान) समोर कुंजडा या जातीचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला.

दरम्यान, ठेलारी जातीचा धनगर जातीमध्ये समावेश करण्यात आल्याने धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची मंत्रालयात भेट घेत आभार व्यक्त केले.

यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, अनंत बनसोडे, विठ्ठल मारनर, वामनराव मारनपावबा गोयेकर, देवा गोयेकर, बापू कोलपे आदी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"