बिग बॉस’च्या घरात यंदा कोण ?

मुंबई, प्रतिनिधी : ‘बिग बॉस मराठी’च्या बहुचर्चित पाचवा सीझनची मोठ्या दणक्यात सुरुवात झालेली आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे. यावर्षी स्पर्धकांसाठी ‘बिग बॉस’चं संपूर्ण घर काचेच्या महालासारखं सजवण्यात आलं आहे.
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना आता बिग बॉस मराठी पाहता येणार आहे.