बनावट तिकिटाद्वारे पुण्याहून लखनौला जाण्याचा डाव फसला

पुणे : . बनावट तिकिटांच्या माध्यमातून इंडिगोच्या विमानाने उड्डाण करण्याचा डाव आखणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. सलीम खान आणि नसीरुद्दीन खान अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सलीम खान आणि नसीरुद्दीन खान हे दोघे बनावट तिकिटांच्या मदतीने इंडिगोच्या विमानाने उड्डाण करून लखनऊला जाण्याच्या तयारीत होते. बनावट तिकीटाच्या माध्यमातून त्यांनी विमानतळावर घुसण्याचा प्रयत्न देखील केला.
ते विमानात चढण्याचा प्रयत्न करताना एअरपोर्ट विभागाला तिकिटे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचे दहशतवादी कनेक्शन आहे का? याबाबत तपास सुरु केला आहे. मात्र यामुळे पुणे विमानतळावर एकच उडाली आहे. बनावट तिकीट घेऊन उड्डाण करण्यामागील त्यांचा हेतू नेमका काय होता? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.