फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
देश विदेश महाराष्ट्र

प्रीती सुदान यांच्याकडे युपीएससी अध्यक्षपदाची सुत्रे

प्रीती सुदान यांच्याकडे युपीएससी अध्यक्षपदाची सुत्रे


नावी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. युपीएससी अध्यक्षपदाचा मनोज सोनी यांना राजीनामा दिला असून त्याजागी १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी त्या पदभार स्वीकारणार आहेत.

मे २०२२ पासून या पदावर मनोज सोनी होते. त्यांची पाच वर्षे उरलेली असतानाच त्यांनी राजीनामा दिला. युपीएससी उमेदवारांनी निवडीसाठी बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्रे वापरल्याबद्दल वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.यामुळे आता त्यांच्या जागी प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२५ पर्यंत असणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणाऱ्या युपीएससी अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी संविधानाच्या कलम 316 च्या कलम (1A) अंतर्गत युपीएससीच्या सदस्या प्रीती सुदान यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

कोण आहेत प्रीती सुदान
प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरमधील १९८३ बॅचच्या IAS अधिकारी असून त्या जुलै २०२० मध्ये केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्या. सुमारे ३७ वर्षांचा सरकारी प्रशासनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आरोग्य सचिव म्हणून तीन वर्षांच्या कार्यकाळात, विशेषत: गेल्या सहा महिन्यांत, कोविड-१९ महामारी हाताळण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी, त्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिव होत्या आणि त्यांनी महिला आणि बाल विकास आणि संरक्षण मंत्रालयातही काम केले होते. राज्य प्रशासनात, त्यांनी वित्त आणि नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि कृषी या क्षेत्रांचे व्यवस्थापन केले. त्यांनी अर्थशास्त्रात एम.फिल आणि एम.एस्सी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"