फक्त मुद्द्याचं!

4th September 2025
गुन्हेगारी पुणे

पोर्शे अपघात प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे

पोर्शे अपघात प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे

प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण चांगलेच गाजले आहे. येरवडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करणे आणि चालकावर दबाव आणून खोटा जबाब द्यायला लावणे, त्याला डांबून ठेवणे, याप्रकरणी अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पोर्शे मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल केले आहे.

तब्बल पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाइलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल इत्यादी महत्त्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत. आता हे खटले जलद गतीने चालविण्याची मागणी लवकरच न्यायालयाकडे करणार असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"