फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
मनोरंजन

पाठकबाईंचा जीव कशात रंगलाय?

पाठकबाईंचा जीव कशात रंगलाय?

मुंबई : अभिनेत्री अक्षया देवधरचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण झालं आहे. या संदर्भातला एक व्हिडीओ शेअर करत तिनं चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनयाव्यतिरिक्त अलीकडच्या काळात बरेच कलाकार हॉटेल, दागिने आणि कपड्यांच्या व्यवसायात पदार्पण करत आहेत. अनेकांनी स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरू करून त्याद्वारे लोकांच्या संपर्कात राहण्याचे माध्यम तयार केले आहे. आता यामध्ये मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाली. यामधील राणादा अन् पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्यामुळे प्रेक्षक आनंदी होतेच पण, आता अक्षयाने तिच्या सगळ्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षयाने स्वत:चं साड्यांचं दालन सुरू करत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनेत्रीला तिच्या या व्यवसायामध्ये आणखी दोन मैत्रिणींची साथ लाभली आहे. अक्षयाने आपल्या नव्या व्यवसायाबद्दल आणि तिच्या दोन मैत्रिणींबद्दल पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

अक्षया म्हणाली, भरजरी – नाम (निधी, अक्षया आणि माधुरी) आम्हा तिघींचं हे स्वप्न… प्रत्येकीने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात पाहिलेलं… एकत्र येऊन पूर्ण करत आहोत. तुमच्या साथीने… विश्वासाने आणि प्रेमाने… हे पाऊल पुढे टाकत आहोत…आपल्या ‘भरजरी’चे नवीन दालन लवकरच सुरू होत आहे. प्रेम कायम असू दे…आमच्यावरही आणि आपल्या ‘भरजरी’ वरही.”

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"