निवृत्तीनिमित्त पालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याची महत्वपूर्ण सुवर्णसंधी लाभली. अग्निशमन विभागात फायरमन म्हणून सुरु केलेला प्रवास अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत येऊन पोहोचला. या प्रवासात शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले, असे प्रतिपादन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पालिकेच्या वतीने माहे जून २०२४ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्यासह ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कार्यकारी अभियंता किशोर निंबाळकर, कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले, उमेश बांदल, नथा मातेरे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये जगताप यांच्यासह कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अकबर शेख, कार्यालय अधिक्षक रमेश चोरघे, लेखापाल पुनमचंद बलदोटा, मुख्याध्यापक शशिकांत गायकवाड, मुख्याध्यापिका माधुरी लवटे, शितल काकडे, सविता केसकर, सफिया शेख, मुख्य लिपीक रमेश लांडगे, सुनील काळदंते, विकास शिंदे, उषा माने, उप लेखापाल संजय काळभोर, सिस्टर इन्चार्ज शोभा भारती, सीमा मोरे, स्टाफ नर्स, प्रतिभा गोडसे, सुरेखा समुद्रे, कनिष्ट अभियंता सुभाष राठोड, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शिवकुमार ग्वालवंशी, वीज पर्यवेक्षक दिलीप गुंजाळ, सहाय्यक उद्यान निरीक्षक गोपाळ खैरे, लिपीक गणेश पौनिकर, सहाय्यक शिक्षक मधुकर भिसे, विशेष शिक्षक राजू भगत, उपशिक्षक सीमा पंडित, बाबूराव लांघी, वसुंधरा कुलकर्णी, सुतार राजेंद्र हात्ते, प्लंबर बाळू चिव्हे, वाहनचालक किशोरकुमार शितोळे, मुकादम लहू पंचरास, शिपाई भीम निकाळजे, बिभीषण सपकाळ, शिवाजी गव्हाणे, राजकुमान साबळे, वॉर्डबॉय ज्ञानेश्वर काटे, मजूर सुरेश जगताप, रमेश पवार, नंदू कंपिले, किसन वाघेरे, बाबू फुगे, यशवंत मोहिते, रखवालदार साहेबराव जाधव, रामचंद्र भागीत, सफाई कामगार भानुदास बनकर, बेबी लोखंडे, नंदा ओव्हाळ यांचा समावेश आहे.
इंदलकर म्हणाले, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उणीव महापालिकेस नेहमी जाणवत राहील. गेली अनेक वर्षे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. यापुढील आयुष्य आरोग्य सांभाळून कुटुंबियांसमवेत आनंदाने जगावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, उपस्थितांचे आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.