फक्त मुद्द्याचं!

19th May 2024
Live news उद्योग

देहूनगरीत इंद्रायणीतीरी वारकऱ्यांची मांदियाळी; भक्तीसागर लोटला!

देहूनगरीत इंद्रायणीतीरी वारकऱ्यांची मांदियाळी; भक्तीसागर लोटला!
  • PublishedMarch 27, 2024

संत तुकाराम महाराज बीजेची उत्सुकता

ज्ञानेश्वरी काशिद पाटील
फक्त मुद्याचे न्यूज नेटवर्क

श्री क्षेत्र देहूगाव: विश्व वंदनीय जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वैकुंठगमण सोहळ्यासाठी बुधवारी सकाळी लाखो वैष्णव जमले आहेत. ‘ बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही…’ याची. अनुभूती आली. देहूनगरीत इंद्रायणीतीरी वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. भक्तीसागर लोटला आहे.

राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. लोकसभेच्या निवडणूकांची धामधुम सुरू झाली आहे. मात्र, सोहळ्याच्या गर्दीवर तसूभरही परिणाम झाला नाही.
बीज काळात संतभूमी देहू नगरीत कोठेही भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.

देहू नगरपंचायत, देहू देवस्थान आणि महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती हवेली, आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणा देहूत तुकाराम बीजेसाठी सज्जता केली आहे. सोहळ्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

देहूगाव परिसरात ठिकठिकाणी हरिनामाचा गजर, भजन किर्तन व हरिपाठाचे गायन करीत परिसर गजबजला आहे. श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुठगमनण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आपआपल्या दिंड्याच्या तळांवर जावून हरिनामाचा जागर सुरू आहेत.
ठीक ठिकाणी सुरू असलेल्या अखंड पारायण, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन आणि आगमन होणाऱ्या दिंड्या व भाविकांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण झाले आहे. देहूनगरीत यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त उपलब्ध आहे.

Written By
Admin@BLOG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"