फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
अर्थकारण महाराष्ट्र

दुधात भेसळ करणाऱ्यांना मोक्का : उपमुख्यमंत्री पवार

दुधात भेसळ करणाऱ्यांना मोक्का : उपमुख्यमंत्री पवार

बारामती : आम्ही सर्वांनी चर्चा करून आता दुध भेसळीच्या संदर्भातला कायदा कडक करतोय. जरी अधिवेशन नसलं, तरी अध्यादेश काढतोय, अन् त्याच्यामध्ये भेसळ करणारी व्यक्ती सापडली, त्यांना आम्ही मोक्का लावणार आहोत.

बारामती तालुक्यातील सांगवी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे भुमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पवार यांनी दूध भेसळ करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

पवार म्हणाले, मला अतिशय जबाबदार व्यक्तींनी सांगितलं की, दादा दुधामध्ये भेसळ केली जाते. काही भागात, काही शहरात खराब पाणी घेऊन त्याच्यात काही दूध मिक्स करून काय काय करायचं ते करतात. नाहीतर ते दूधच भेसळयुक्त असतं. त्याच्यामध्ये कोण म्हणतं, पाम ऑइल टाकतात, कोण म्हणतं युरिया टाकतात. कोण म्हणतं आणखी काय काय टाकतात. त्याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात दूध वाढतं. परंतु नागरिकांच्या जिवाशी ते खेळतात

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना दूध भेसळ करणारे सिद्ध झाले आणि त्याने भेसळ केलेली असेल तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी, इथपर्यंतचा आम्ही कायदा कडक करत होतो. पण असे कायदे करत असताना आम्हाला विधिमंडळाची मान्यता घेऊन राष्ट्रपती महोदयांकडे जावं लागतं, पण राष्ट्रपतींनी त्याला काही मान्यता दिली नाही. त्यामुळे तो कायदा करता आला नाही. तरीदेखील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दुग्धविकास मंत्री, सगळे अधिकारी, काही दूध धंद्यातले महत्त्वाचे लोक असे आम्ही सर्वांनी चर्चा करून आता भेसळीच्या संदर्भातला कायदा कडक करायचे ठरवले आहे असे पवार म्हणाले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"