तुम्हाला माहिती आहे कधी होणार पृथ्वीचा शेवट?

समुद्राच्या पलिकडे काय आहे? आकाशाच्या पलिकडे काय दिसेल? इंद्रधनुष्याच्या कमानीची सुरुवात आणि शेवट कुठे आहे, ती जागा बघायला मिळेल का, तसंच पृथ्वी कधी नष्ट होणार आहे आणि या विश्वाबद्दलच्या अनेक गोष्टींबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर क्वोरा या प्लॅटफॉर्मवर कोणीतरी प्रश्न विचारला होता की, आपल्या पृथ्वीचा अंत कधी होणार आहे?
अनेकांनी आपल्या ज्ञानानुसार त्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
आपण सगळेच जाणतो की, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. माणूस, जनावरं, रोपं, झाडं, निसर्ग या सगळ्यांचा एक ना एक दिवस शेवट होणार आहे. पृथ्वीच्या बाबतीतही तेच लागू पडतं. पृथ्वीची जशी निर्मिती झाली आहे, तसाच एक दिवस तिचा अंत सुद्धा निश्चित आहे. पण हा दिवस कधी येईल, आणि तो अंत कसा असेल हे बघायला पृथ्वीवर माणूस जिवंत राहील का? हे आपल्या कोणालाच निश्चित असं सांगता येणार नाही.
लोकांची याबद्दल मतं काय आहेत?
क्वोरा प्लॅटफॉर्मवर एकानं म्हटलं आहे की, सध्याचा काळ हा कलियुगाच्या अंताचा आणि सत्ययुगाच्या प्रारंभाचा काळ आहे. आपला अंत जवळ आला आहे आणि नवीन दिवस, नवीन जग, सत्ययुग सुद्धा आता जवळ येऊ लागलं आहे.
कोणी सांगतं, जेव्हा जागतिक युद्धात अणुबॉब्मचा वापर केला जाईल, तेव्हा या विश्वाचा शेवट होईल.
तर कोणाला वाटतं की, श्रीमद्भागवतानुसार दोन कल्पांनंतर सृष्टीचा अंत होत असतो. प्रत्येक कल्पात एक अर्ध प्रलय होतो. दोन कल्प म्हणजे दोन हजार चतुर्युग. अशा प्रकारे दुसरा कल्प पूर्ण झाल्यानंतर प्रलय येतो म्हणजेच, तेव्हा सृष्टीचा विनाश होतो.
कधी होईल पृथ्वीचा अंत?
या विषयावरचे काही अधिकृत स्रोत सांगतात याबद्दल चर्चा करतात. एस्ट्रोनॉमी वेबसाइट आणि बीबीसी सायन्स फोकस यांच्या माहितीनुसार, पृथ्वीचा अंत अनेक प्रकारे होऊ शकतो. एखादी मोठी उल्का पृथ्वीवर आदळू शकते. पृथ्वीवरचा ऑक्सिजन संपून जाणं किंवा सूर्याचं रूपांतर कृष्ण विवरात होणं आणि त्यात पृथ्वी ओढली जाईल, असं यापैकी काहीही घडू शकतं. पण असं मानलं जातं की, हे सगळं पुढची अनेक वर्ष घडू शकणार नाही. अशातच मनुष्याचं अस्तित्त्व सध्यातरी संपणारं नाहिये. आत्ता सुद्धा अब्ज वर्षांपर्यंत पृथ्वी आणि पृथ्वीवरचं अस्तित्व टिकून राहणार आहे. पृथ्वीच्या शेवटाबद्दल लोक वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत असतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, ते आमच्यापर्यंत नक्की कळवा.