फक्त मुद्द्याचं!

30th April 2025
लाईफस्टाईल

तुम्हाला आहेत का या ५ सवयी?

तुम्हाला आहेत का या ५ सवयी?

आयुष्यात यशस्वी होण्यासीठ फक्त शिक्षणाच्या पदव्या आणि पैसा पुरेसा नसतो. समोरच्या व्यक्तीचा आदर करणंही आपल्याला जमलं पाहिजे. काही माणसं फार कमी बोलतात तरीही त्यांचं प्रत्येक म्हणणं मान्य केलं जातं. तर काही माणसं अति बोलतात पण त्यांच्या बोलण्याकडे कोणी फारसं महत्त्वही देत नाही.

समाजात आपण कसं वागल्यावर आपल्याला समोरून काय वागणूक मिळेल, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. आपलं कौतुक व्हावं, आपल्याला आदर मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. पण मग त्यासाठी आपण नेमकं काय करायचं असतं आज आम्ही तुम्हाला अशा पाच सवयी सांगणार आहोत, ज्यांचा अंगिकार केल्यानंतर तुम्हाला आपोआप इतरांकडून आदर मिळेल.

  1. सकारात्मक रहा – कायम सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यानं लोकांबरोबरचा सहवास आपल्याला आवडू लागतो. इतरांच्या यश आपण साजरं करू शकतो आणि त्यांचं कौतुकही करतो. सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारल्यानंतर इतरांकडून सहज आदर कमावू शकता.
  2. विनम्र रहा – समोरच्या व्यक्तीकडून आदर मिळविण्यासाठी स्वतः विनम्र असणं खूप आवश्यक आहे. धन्यवाद, कृपया, क्षमस्व अशा शब्दांमुळं तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर देत असता. इतरांच्या मतांचाही आदर केला पाहिजे. विनम्रता म्हणजे आपल्यातला कमकुवतपणा नव्हे, तर तुमची सशक्त बाजू आहे.
  3. दुसऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर – जेव्हा इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही तत्पर असता, तेव्हा त्यातूनच तुम्हाला त्यांची किती किंमत आहे, हे दिसून येतं. गरजेच्या वेळी मदत केल्यानं तुम्ही इतरांच्या मनात घर करू शकता.
  4. विश्वासार्ह बना – आदर कमावण्यासाठी विश्वासार्ह असणं खूप गरजेचं आहे. जी व्यक्ती आपल्या शब्दांवर ठाम आहे आणि दिलेला शब्द पाळण्याची जिच्यात धमक आहे, त्या व्यक्तीवर लोक अगदी सहज विश्वास ठेवतात. वेळ पाळणं आणि जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं.
  5. समोरच्याचं म्हणणं लक्ष देऊन का – आदर मिळवायचा असेल तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे, समोरच्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं म्हणणं बारकाईनं ऐकता तेव्हा त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित होत असतं. समोरच्या व्यक्तीला ही गोष्ट आवडते आणि सहाजिक ती व्यक्ती तुम्हाला आदर देते. संवाद साधताना मध्येच थांबवण्याऐवजी त्यांचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करा.
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"