जॅकी श्रॉफ वाईट अभिनेता?

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्माते व दिग्दर्शक म्हणजेच सुभाष घई. बॉलीवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. सुभाष घई हे बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्यांबद्दल त्यांचं मत ठामपणे मांडतात.
ते म्हणतात, अभिनेत्यांचे पाच प्रकार असतात. एक नॉन अॅक्टर असतो. दुसरा म्हणजे वाईट अभिनेता. वाईट अभिनेता जॅकी श्रॉफ होता. अनिल कपूर चांगला अभिनेता आहे. अतीआत्मविश्वासू शत्रुघ्न सिन्हा होते, त्यांची सर्वात मोठी समस्या ही होती की ते कधीच वेळेवर यायचे नाहीत.”
एका मुलाखतीत काही स्टार्सबद्दल सुभाष घई यांनी केलेली विधानं चर्चेत आहेत. अरबाज खानचा चॅट शो ‘द इनव्हिन्सिबल्स सीरीज’च्या सीझन २ मध्ये सुभाष घई सिनेसृष्टीबद्दल गप्पा मारताना दिसतील. या शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे, यामध्ये सुभाष घई जॅकी श्रॉफ यांना सर्वात वाईट अभिनेता म्हणतात. यावेळी ते शत्रुघ्न सिन्हासह इतर काही जणांबद्दल मत मांडतात. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ व अनिल कपूर यांच्याबरोबर १९८९ मध्ये आलेल्या ‘राम लखन’ या चित्रपटात काम केले होते. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर ‘कालीचरण’ (१९७६) आणि ‘विश्वनाथ’ (१९७८) या चित्रपटांसाठी एकत्र काम केले होते.
शाहरुख खानबरोबर मतभेद
सुभाष घई यांनी १९९७ मध्ये आलेल्या ‘परदेस’ या चित्रपटात शाहरुख खानबरोबर काम केलं होतं. त्याबद्दल म्हणाले, “मी शाहरुख खानबरोबर परदेसमध्ये काम केलं होतं, पण आम्हा दोघांमध्ये त्यावेळी खूप मतभेद होते. आमचे एकमेकांशी वाद होत असायचे.” एकवेळ अशी आली होती की सुभाष घई यांनी स्टार्सबरोबर काम न करायचं ठरवलं होतं. “कर्ज (१९८०) या चित्रपटानंतर मी ठरवलं की जर मला चांगले चित्रपट तयार करायचे असतील तर मी आताच्या कोणत्याच स्टारबरोबर काम करणार नाही,”