फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी महाराष्ट्र

जाधववाडीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय

जाधववाडीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारण्यासाठी जागा निश्चितीचा बहुप्रतिक्षीत निर्णय अखेर झाला. जाधववाडी-चिखली येथील गट. नं. ५३९ मधील ३ हे. ३९ आर. शासकीय जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थान आणि परेड ग्राऊंड प्रयोजनाकरिता प्रदान करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीचा लढा आपण यशस्वी केला. दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. पण, आयुक्तालयासाठी स्वतंत्र- हक्काची इमारत नव्हती. त्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विभागांकडून सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले.

मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्तालय, चिखली पोलीस स्टेशनसाठी जागा व दापोडी पोलीस स्टेशनची निर्मिती याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संबंधित विषय मार्गी लावण्याबाबत आग्रही मागणी केली होती.

या संदर्भात आमदार महेश लांडगे म्हणाले की, माझ्या मतदार संघातील मोशी-चिखली या भागात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. पिंपरी-चिंचवड न्यायालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रस्तावित मोशी शासकीय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर आणि विशेष म्हणजे, भारतातील पहिले ‘‘संविधान भवन’’ उभारले जात आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील हा परिसर आता ‘प्रशासकीय संस्थांचा केंद्रबिंदू’ म्हणून नावारुपाला येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महायुती सरकारचे तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"