फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
मनोरंजन

“चंदू चॅम्पियन“ करमुक्त करा

“चंदू चॅम्पियन“ करमुक्त करा

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडचे भूषण असलेल्या पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे प्रेरणादायी कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने “चंदू चॅम्पियन” चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केली आहे.

पिंपरी -चिंचवड कलाप्रेमी मंच आणि स्वराज ग्रुपच्या वतीने पॅरा ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. येथील सायन्स पार्कच्या प्रेक्षागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, मातोश्री संस्थेचे हेमंत खंडागळे, पद्मयानी ट्रस्टचे विष्णू मांजरे, मुख्य संयोजक विजय जगताप व विजय अण्णा चौधरी उपस्थित होते. पेटकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र देऊन या वेळी सत्कार करण्यात आला.

ही एका अपंगाची कहाणी नसून प्रतिकूल काळ व परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ऑलिम्पिक विजेता व्हायचंच हा जिद्दीचा प्रवास म्हणजे पेटकर सरांनी रचलेले कार्य आहे, अशी भावना शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केली

कांबळे म्हणाले, अपंगांना ऊर्जा देण्याचे काम पेटकर यांनी केले तर आहेच. मात्र, जे धडधाकट आहेत अशा सर्वांना प्रेरणा व साहसरूपी बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. या शहरात १९८२ पासून त्यांचे वास्तव्य असून वास्तविक पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

पेटकर यांनी आपल्या मुलाखतीत १९६५ च्या युद्धातील प्रसंग कथन केले. यावेळी नऊ गोळ्या लागल्यानंतरही त्यांनी जलतरणात मिळवलेले कौशल्य ते पॅरा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यापर्यंत आपल्या आयुष्यातील सर्व टप्पे कथन केले. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट साकारण्यासाठी कबीर खान यांनी केलेली मेहनत यावरही ते व्यक्त झाले.

गौरव चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर उल्हास मापुस्कर यांनी आभार मानले. सत्कार सोहळ्यानंतर मुलाखतकार विजय पाटील यांनी पेटकर यांची प्रकट मुलाखत घेतली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"