फक्त मुद्द्याचं!

19th May 2024
अध्यात्म कला साहित्य

गौतमीची अदा अन् सारा गाव फिदा !!

  • PublishedMarch 23, 2024

विशेष प्रतिनिधी
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क

तमाशाच्या फडात ‘‘पोटासाठी नाचते, मी पर्वा कुणाची…’’, लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी राष्ट्रपतींसमोर सादर करून महाराष्ट्राचे लावणी वैभव घडविले. लावणीची शालिनता, नजाकतता जपली. ग्राम्यसंस्कृतीत रुजलेली आणि वाढलेली बहुजन वर्गातील लावणी ‘‘या रावजी, बसा भावजी, कशी मी राखू तुमची मर्जी…’तून लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अभिजन वर्गात रूढ, लोकप्रिय केली, सातासमुद्रापार पोहोचविली. मात्र, अभिजन आणि बहुजन वर्गातील महाराष्ट्रवैभवी लावणीत भर टाकण्याचे काम लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील करत आहे.

महाराष्ट्रातील लावणीला एक वैभवी परंपरा आहे. शाहीर पठ्ठे बापूराव, रामजोशी, होनाजी बाळा, परशराम, सगणभाऊ, अनंत फंदी, प्रभाकर, शाहीर हैबती, लहरी हैदर यांच्यापासून तर अलीकडच्या कालखंडातील ग. दि. माडगुळकर, कवी संजीव, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर, गुरू ठाकूर या शाहिरांनी काळानुसार लावणीचे सौंदर्य अधिक खुलवले. तर मराठीच्या महाराष्ट्र लावणीच्या शब्दसौंदर्याला साजेशी नजाकतता आणि अदाकारी भरून ती लावण्याआधी रसिकांसमोर आणले.

महाराष्ट्राच्या लावणीची वैभवी परंपरा आणि लावण्य हे लावणी कलावंतांनी जपून त्यामध्ये आपल्या अदाकारी, नजाकतता भरून ती परंपरा समृद्ध केली. मात्र, गौतमी पाटील यांनी लावणीच्या नावाखाली सुरू केलेला धांगडधिंगा याने परंपरेला गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात यमुनाबाई वाईकर, सुलोचनाबाई चव्हाण यांनी लावणी गायिकांनी लावणीचे शब्दसौंदर्य स्वरांतून वर्णन केले. दिलखेच अदांनी सादर करण्याचे काम विठाबाई नारायणगावकर, हौसा-मंजुळा कोल्हापूरकर, कांताबाई सातारकर, रोशन सातारकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मंगला बनसोडे, संजीवनी मुळे-नगरकर, यांसारख्या लावणीसम्राज्ञींनी केले. त्याचबरोबर लावणीचे सौंदर्य अधिक खुलून दाखवण्याचं काम सुरेखा पुणेकर, छाया- माया खुटेगावकर, राजश्री नगरकर अशा लावण्यवतींनी अधिक भर टाकली. मात्र, अलीकडच्या कालखंडामध्ये लावणीला वेगळा बाज दिला आहे.

मूळची धुळ्याची असणाºया गौतमीने अत्यंत प्रतिकूलतेवर मात करीत नृत्यक्षेत्रात नाव कमविले आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहेच.

‘‘छत्तीस नखरेवाली…’’, ‘‘सरकार तुम्ही केलय मार्केट जाम…’’, ‘मी नार ठसक्याची…’, ‘हिºयाची अंगठी रूतून बसली…’, ‘राघू पिंजºयात आला…’, ‘हिला काय सोनं लागलय का..’, ‘राजा घोट भर दे मला…’, ‘पाटलांचा बैलगाडा…’ यावरील लावण्या फेमस आहेत. तिच्या आजवरच्या परिश्रम आणि जिद्दीचे कौतुकही.

….
अदेवर फिदा…
शाहीर पठ्ठे बापूराव यांच्यापासून तर सुलोचना चव्हाण यांच्या ‘‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ विठाबाई नारायणगावकर यांनी ‘ पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची…’ यांनी लावणीचा संघर्ष तर सुरेखा पुणेकर यांनी ‘या रावजी बसा भावजी…’ तून लोकमनाशी एकरूप झालेल्या लावणीचे सौंदर्य उलगडून दाखवलं, तर छाया-माया खुटेगावकर, राजश्री नगरकर, तसेच मराठी चित्रपटातील लावणी नृत्यांगणांनी वैभवी परंपरेत भर टाकली. तर रिमिक्स आणि डीजेच्या जमान्यातही गुरू ठाकूर यांनी ‘‘वाजले की बारा…’ आणि ‘‘श्वास रंगती, प्राण गुंफती, अधर झनकारी…’ ही लावण्या आयटीवर्गातही लोकप्रिय आहेत. आजवरची परंपरा पाहता, सर्व कलावंतांनी आपल्या नजाकततेने आणि अदाकारीने ही लावणी अधिक खुलवली आहे. त्यामुळे मराठीमन लावणीच्या अदेवर फिदा असल्याचे दिसून येते. त्यामुळे लावणीची नजाकतता ठेऊन सादरीकरणावर भर दिला म्हणूनच गौतमीची लावणी ‘सबसे कातील’ आहे.

Written By
Admin@BLOG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"