अल्पवयीन मुलाची आत्महत्या

प्रतिनिधी, पिंपरी : पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून चौदा वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी (१३ जुलै) सकाळी घडली असून, आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पिंपळे सौदागर येथील एका उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये इमारतीच्या सातव्या मजल्यावरून एका नववीत शिकणाऱ्या मुलाने उडी मारली. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना त्याला त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
मृत मुलाचे पालक परळी येथे वास्तव्यास आहेत. त्यांना घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. उडी मारल्यानंतर मुलाची प्रकृती खूप गंभीर होती. या स्थितीत त्याला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सांगवी पोलिस पुढील तपास करीत आहेत.