समृद्धी महामार्गाला भेगा !

नागपूर, प्रतिनिधी : मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून केवळ वर्षभराताच महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ तीन सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याचे फोटो व व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत.
समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एसएसआरडीसीने केला होता. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. महामार्गाची वर्षभरातच अशी दुरवस्था झाली असल्यामुळे भविष्यात काय होणार याविषयी वाहनचालक चिंता व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्राचा स्वप्नवत प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. मात्र, उद्घाटन होऊन एक वर्षही लोटले नाही. तोच हा प्रकार समोर आला आहे. काही ठिकाणी खड्डेदेखील पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे, याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकतीच तक्रार केली आहे.
…..