फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र राजकारण

पशुधन वाचविण्यासाठी अनुदानाची मागणी

पशुधन वाचविण्यासाठी अनुदानाची मागणी

प्रतिनिधी, पिंपरी : महाराष्ट्रातील पशुधन वाचविण्यासाठी गोमाता व पशुधन सुरक्षित ठेवणाऱ्या गोशाळा, पांजरपोळ यांसारख्या संस्थांना राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात यावे, अशी मागणी समस्त महाजन या संस्थेचे महाराष्ट्र राज्यातील १०८६ गोशाळांचे समन्वयक रमेश ओसवाल यांच्यासह झालेल्या चर्चेत पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

निती आयोगाच्या मते १ हजार गायींसाठी गोशाळा चालवण्याचा एकूण खर्च जमिनीसह प्रतिदिन १ लाख १८ हजार १८२ रुपये आहे. जमिनीशिवाय हा खर्च ८२ हजार ४७५ रुपये प्रतिदिन आहे. पशुधन सुरक्षित राहिल्याने दुधाचे उत्पादन वाढेल व भेसळयुक्त दुधास आळा बसेल. नैसर्गिक शेतीमुळे महाराष्ट्रातील जनतेला मोठा आर्थिक फायदा होईल. तसेच स्वास्थ्य लाभेल. पर्यावरणाला सुध्दा फायदा होइल. या महत्वाच्या विषयावर स्वतः लक्ष घालून महाराष्ट्रातील पशुधन वाचविण्यासाठी गोशाळा व पांजरपोळ यांसारख्या संस्थांना तातडीने अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महाराष्ट्रातील पशुधन वाचवण्यासाठी शासनाकडून आजमितीस आर्थिक मदतीची कोणतीही तरतूद नाही. पशुधनाच्या संरक्षणासाठी अतिरिक्त संसाधनांची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील १ हजार ६५ गोशाळा, पांजरापोळच्या माध्यमातून एक लाखांहून अधिक गोमाता व पशुधन सुरक्षित ठेवले जात असले तरी मोठ्या संख्येने पशुधन अजूनही भटकत आहे. कोणत्याही आधाराशिवाय रस्त्यावर भटकणे किंवा अपघात आणि बेकायदेशीर हत्या इ. यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व संस्थांमध्ये पुरेशी क्षमता तयार करणे शक्य आहे. मात्र आज रोजी कोणतीही सुविधा व आर्थिक मदत नाही.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"