‘अमिताभ बच्चन’यांच्या नावावरुन संसदेत गदारोळ

नवी दिल्ली : राज्यसभेच्या सभागृहात सभापती जगदीप धनखड यांनी, श्रीमती जया अमिताभ बच्चन.. असं नाव उच्चारताच, क्यों अमिताभ का नाम क्यों?
असं म्हणत खासदार जया बच्चन संतापल्या!
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन पुन्हा अमिताभ बच्चन यांच्या नावाच्या उल्लेखावरुन संसदेत संतापल्. प्रकरण इतके वाढले की सभापती जगदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक वाद झाला. सभापती धनखड यांनी खासदार जया बच्चन यांना संसदेतील नियमाची आठवण करुन दिली. तसेच जर नावाबद्दल काही अडचण असल्यास, नाव बदला असा सल्ला सुद्धा सभापतींनी दिली. याच सर्व प्रकरणात जया बच्चन यांनी संसदेत एक अनोखी मागणी केली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या नावात बायकोच्या नावाचा उल्लेख करावा अशी मागणी जया बच्चन यांनी केली.
नेमका गदारोळ काय झाला?
नावात काय आहे, असं शेक्सपिअर यांनी म्हटलं आहे. पण नावावरुनच संसदेत गदारोळ झाला आहे. प्रश्नकाळाच्या सत्रात जया बच्चन यांचे नाव उच्चारत असताना सभापती जगदीप धनखड यांनी खासदार जया अमिताभ बच्चन असा उल्लेख केला. जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांचे नाव का घेतले, असा प्रश्न सभापतींनी विचारला. यावर सभापतींनी सांगितले, की या ठिकाणी तुमच्या नावाची नोंद अशाच प्रकारची करण्यात आलेली आहे. त्यामुळे मी थेट तसाच उल्लेख केला. पुढे सभापती धनखड यांनी संसदीय कार्यपद्धतीत थेट नाव बदलून घ्या असा सल्ला दिला.